August 30, 2024 1:51 PM August 30, 2024 1:51 PM
6
अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल
अरबी समुद्रात ईशान्येकडे 'असना' हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ बाब असून, याआधी १९६४ साली ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं. सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे आणि त्यानंतर कच्छ किनाऱ्याकडे सरकेल. कच्छच्या किनाऱ्यावरून हे चक्रीवादळ ईशान्...