June 15, 2024 2:57 PM June 15, 2024 2:57 PM

views 33

साहित्य अकादमी २०२४ साठी समशेर आणि भूत बंगला कादंबरीला पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा पुरस्कारात मराठीतल्या देविदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड  झाली आहे.