December 12, 2024 11:01 AM December 12, 2024 11:01 AM
5
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल
सातारा इथले तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.