September 21, 2024 7:11 PM

views 24

समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातले पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते.  आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आज गिरगाव चौपाटीवर वाळूश...