November 13, 2024 10:30 AM November 13, 2024 10:30 AM

views 10

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. वंचित बहुजन...

November 9, 2024 6:49 PM November 9, 2024 6:49 PM

views 10

महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली – प्रधानमंत्री

महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपाला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अकोला इथं एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची सेवा करण्यात वेगळंच सुख मिळतं, असंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानम...

November 6, 2024 9:33 AM November 6, 2024 9:33 AM

views 10

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. आठ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक, नऊ तारखेला अकोला आणि नांदेड, १२ तारखेला चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे आणि १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत.