July 15, 2024 7:16 PM July 15, 2024 7:16 PM
3
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अमोल शिंदे याच्यासह ६ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल
संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असतांना प्रेक्षकदीर्घेतून दालनात उतरत, धुराचे डबे फोडले होते.