July 14, 2024 3:29 PM July 14, 2024 3:29 PM

views 13

शेअर बाजार गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आशिष शहाला अटक

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ९०० ग्रॅम सोनं आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आत्तापर्यंत जवळपास ४०० ते ५०० जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.