February 7, 2025 3:30 PM February 7, 2025 3:30 PM
9.2K
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच, अरविंद सावंत यांची स्पष्टोक्ती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, कोणीही पक्ष सोडणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्यातलं अपयश चर्चेत येऊ नये म्हणून जाणून बुजून अशा अफवांची राळ उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सावंत यांच्यासह संजय देशमुख, नागेश आष्टीकर पाटील, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, भाऊसाहेब वाक्चौरे आणि पवन राजे निंबाळकर हे खासदार यावेळी उपस्थित होते. संजय राऊत, संजय दिना पाटील...