August 14, 2024 5:06 PM August 14, 2024 5:06 PM

views 11

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईनचं आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं. व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यभरात लागू करणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं.