September 4, 2024 9:36 AM September 4, 2024 9:36 AM
8
नागालँडमधल्या वोखा जिल्हा प्रशासनाला ई गव्हर्नन्ससाठीचा सुवर्ण पुरस्कार
नागालँडमधल्या वोखा जिल्हा प्रशासनानं सुरू केलेल्या वोखा साथी या व्हॉटसऍप उपक्रमाला राष्ट्रीय इ गव्हर्नन्स योजना पुरस्कारांमधला सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. ई गव्हर्नन्ससाठी नागालँड सरकारला पहिल्यांदाच सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. वोखा साथी हा कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपक्रम असून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी तो सुरू करण्यात आला आहे. याद्वारे वोखा जिल्हा प्रशासनाच्या ४० पेक्षा जास्त सेवांचा लाभ नागरिकांना व्हॉटसऍप मंचावर मिळणार आहे. तसंच नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या संवादामधून कुठल्याही...