November 6, 2024 9:17 AM November 6, 2024 9:17 AM
20
मतदार जागृतीसाठी राबविली जाणार विशेष मोहीम – एस.चोक्कलिंगम
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत केलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली; त्यावेळी ते बोलत होते. मतदार जागृतीसाठी येत्या आठ तारखेपासून मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष मोहीम राबविली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. निवडणूकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं...