July 24, 2024 7:06 PM July 24, 2024 7:06 PM
19
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनात आजी माजी आमदारांना संबोधित करणार
येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते, २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ' वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ' या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे, असं विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी सा...