October 16, 2024 8:56 AM October 16, 2024 8:56 AM

views 14

विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे.   दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्...

July 2, 2024 6:57 PM July 2, 2024 6:57 PM

views 11

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवारांचे एकूण २४ अर्ज दाखल

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी एकूण २४ अर्ज भरले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्...

June 26, 2024 7:05 PM June 26, 2024 7:05 PM

views 18

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६४ टक्के मतदान

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात ५२ पूर्णांक १८ शतांश टक्के, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ७३ पूर्णांक ३६ शतांश टक्के मतदान झालं होतं.  कोकण पदवीधर मतदारसंघात ५९ पूर्णांक ३१ शतांश टक्के, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ७० टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  नाशिकमधे २१ उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांना पसंतीक्रमानुसार मते देण्यास वेळ लागत असून अंतिम आकडेवारी उशिरा उपलब्ध होईल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं. नाशिक शहरात बी डी ...

June 14, 2024 4:37 PM June 14, 2024 4:37 PM

views 23

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मतदारांची यादी निश्चित

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र २१ वरून ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. येत्या २६ जून रोजी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.