October 27, 2024 1:56 PM October 27, 2024 1:56 PM
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत १६ नावांचा समावेश आहे. यात दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना, तर अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर ...