June 13, 2025 4:14 PM June 13, 2025 4:14 PM
13
भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट करायची किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत नावांची भर घालणं किंवा नावं वगळणं याबाबत केले गेलेले दावे अतिशयोक्त असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी म्हटलं आहे. भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट करायची किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नसून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार केली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या अनुषंगाने काही बाबी स्पष्ट करणं गरजेचं असल्याचं त्यांनी ...