July 1, 2024 8:05 PM July 1, 2024 8:05 PM

views 12

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रिय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.

June 29, 2024 7:24 PM June 29, 2024 7:24 PM

views 2

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची मागणी

विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली. गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली. चर्चेच्या माध्यमातून सर्वसहमतीनं देखील सभापती निवडण्याची विरोधकांची तयारी आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात निर्णय घेण्यास...

June 18, 2024 7:07 PM June 18, 2024 7:07 PM

views 14

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे.  या निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी जारी होणार असून २ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. ३ जुलैला अर्जांची छाननी होईल आणि ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.  मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा...

June 14, 2024 11:44 AM June 14, 2024 11:44 AM

views 20

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगेंना उमेदवारी जाहीर

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.