June 27, 2024 5:36 PM June 27, 2024 5:36 PM
8
काँग्रेस नेते विलास राऊत, आसावरी देवतळे आणि विजय देवतळे पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित
काँग्रेसचे यवतमाळमधले नेते विलास राऊत आणि चंद्रपूरमधले नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही कारवाई केल्याचं पक्षाचे नेते नाना गावंडे यांनी सांगितलं.