August 10, 2024 8:34 PM August 10, 2024 8:34 PM
10
संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाड इथल्या भूस्खलनानं बाधित लोकांच्या पाठीशी उभा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
केरळमधल्या वायनाड इथं झालेल्या भूस्खलनामुळे बाधित लोकांच्या पाठीशी संपूर्ण देश आणि केंद्र सरकार उभं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज वायनाड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन कामाबाबत आढावा बैठकीला संबोधित केलं. मदतकार्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यादृष्टीनं राज्याच्या गरजांबाबत तपशीलवार निवेदन पाठवावं असं आवाहन त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केलं. राज्य सरकारनं भूस्खलनामुळे बाधित झाल...