July 1, 2024 8:07 PM July 1, 2024 8:07 PM
10
लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ
लोकसभेच्या आजच्या कामकाजात आभार प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन गदारोळ झाला. त्यांच्या विधानावर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला. राहुल गांधी हिंदू धर्मीयांना सरसकटपणे हिंसक म्हणत असल्याचं सांगत, हे गंभीर असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सभापती ओम बिर्ला यांनी संसद सदस्यांनी सभागृहाचं पावित्र्य राखावं अशी टीका केली. नंतर राहुल गांधी या...