February 7, 2025 3:42 PM February 7, 2025 3:42 PM

views 7

लोकसभेत आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगालला ...

February 3, 2025 3:31 PM February 3, 2025 3:31 PM

views 11

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमधे आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीने मसुदा...

February 3, 2025 1:18 PM February 3, 2025 1:18 PM

views 14

वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत आज सादर होणार

लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीने मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं असून काही सदस्यांनी असहमतीच्या नोंदी केल्या आहेत.

August 1, 2024 8:38 PM August 1, 2024 8:38 PM

views 20

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक २०२४ आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकाअन्वये २००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल. जल जीवन मिशनअंतर्गत देशभरात १५ कोटीपेक्षा जास्त नळ जोडण्या देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.   दरम्यान, वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून ...

July 29, 2024 4:58 PM July 29, 2024 4:58 PM

views 19

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 29, 2024 7:05 PM July 29, 2024 7:05 PM

views 14

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यसभेत आज अल्पकालीन चर्चा झाली. भाजपाचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी चर्चेला सुरुवात केली. अक्षम्य निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, रेल्वे अपघात, मणिपूरमधला हिंसाचार, नीट परीक्षा इत्यादी विषयांवर चर्चा करण्याची परवानगी सभागृहाने का दिली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय...

July 22, 2024 8:09 PM July 22, 2024 8:09 PM

views 18

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर उद्या एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर  एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल.  राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सदस्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन केलं. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना या उपक्रमाअंतर्गंत गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागातील ११ कोटी ७५ ला...

July 4, 2024 3:17 PM July 4, 2024 3:17 PM

views 9

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीशी संबंधित नियमांमध्ये बदल

संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदारांच्या शपथविधीच्या वेळी घोषणाबाजी झाल्यानंतर सभापती ओम बिरला यांनी त्यासंबंधीच्या नियमात बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेतेवेळी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही.  

July 2, 2024 7:59 PM July 2, 2024 7:59 PM

views 13

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.

July 2, 2024 6:50 PM July 2, 2024 6:50 PM

views 20

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.  गेल्या १० वर्षातल्या रालोआ सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत मोदी यांनी सांगितलं, देशाची अखंडता आणि एकात्मता यांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थराला जाऊ ...