October 4, 2024 8:12 PM October 4, 2024 8:12 PM

views 5

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर

राज्य सरकारकडून दिला जाणारा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर झाला आहे. दृश्य, कला क्षेत्रात रेखा आणि रंगकला विभागातल्या योगदानाकरता २०२२-२३ या वर्षासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. ५ लाख रुपये, स्मृती चिन्ह आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

October 2, 2024 3:44 PM October 2, 2024 3:44 PM

views 7

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर

दृष्यकलेच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना राज्यशासनातर्फे देण्यात येणारा वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना  जाहीर झाला आहे. सन २०२२-२३ साठीच्या  पुरस्कारासाठी शोधसमितीची बैठक उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे.