February 11, 2025 2:28 PM February 11, 2025 2:28 PM

views 2

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १२९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १२९ पदकं असून यात ३३ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलं ४९ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर असून कर्नाटक ३२ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

February 3, 2025 2:13 PM February 3, 2025 2:13 PM

views 8

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये पुरुष संघांत सेना दल संघाला तर महिलांच्या संघांत केरळला सुवर्ण पदक

व्हॉलीबॉलमधे पुरुष संघांच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात सेना दल संघाने केरळचा ३-१ असा पराभव करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. सेना दल संघाने पहिले दोन सेट २५-२० आणि २५-२२ असे जिंकले. तिसऱ्या सेटमधे केरळने जोरदार टक्कर देत सेना दल संघाला २५-१९ असं नमवलं. मात्र चौथ्या सेटमध्ये सेना दल संघाने केरळला २५-१९ च्या फरकाने हरवून सुवर्ण मिळवलं. कांस्य पदकाच्या सामन्यासाठी तामिळनाडूने उत्तराखंडला ३-० असं हरवलं. महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळने तामिळनाडूचा ३-२ असा पराभव केला. पहिला स...