February 4, 2025 5:37 PM February 4, 2025 5:37 PM
19
भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदतवाढ
भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकरण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रीमंडळानं आज मुदत वाढ दिली. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल. शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्यासाठी ही सवलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज ही बैठक झाली. सातारा जिल्ह्यात कोयना जलाशय...