April 15, 2025 8:55 AM April 15, 2025 8:55 AM

views 11

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

वाढती लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औदयोगिक क्षेत्रं यामुळे अग्निशमन सेवेचं कार्य आव्हानात्मक झालं असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ काल राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत झाला; त्यावेळी ते बोलत होते. मुंबई अग्निशमन दल तसंच तसेच राज्याच्या इतर महानगर पालिकांमधल्या ८ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. अग्निशमन...

February 11, 2025 9:36 AM February 11, 2025 9:36 AM

views 7

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं राज्यपालांच्या उपस्थितीत उद्घाटन

आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.  

February 3, 2025 2:20 PM February 3, 2025 2:20 PM

views 12

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी राजभवनात राज्यपालांची घेतली भेट

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमधे सहकार्याची भावना वाढीला लागावी, अशी इच्छाही व्यक्त केली. भारतात क्रिकेट या खेळाची लोकप्रियता नमूद करून बॅडमिंटनमधे भारताच्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं.

July 3, 2024 8:24 PM July 3, 2024 8:24 PM

views 9

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या रांची इथल्या निवासस्थानी ही बैठक झाली. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांना आर्थिक घोटाळा...