November 13, 2024 1:51 PM November 13, 2024 1:51 PM

views 20

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रिय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.   भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. काँग...