February 4, 2025 10:58 AM February 4, 2025 10:58 AM

views 8

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांची एकतर्फी युद्धबंदीची घोषणा

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतले होते तर बुकावू ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त आहे. वांशिक संघर्षामध्ये या युद्धाचे मूळ आहे.

January 16, 2025 1:41 PM January 16, 2025 1:41 PM

views 15

इस्रायल आणि हमास यांची युद्धबंदीसाठी सहमती

इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. कतारचे प्रधानमंत्री मोहंमद बिन अब्दुल रेहमान अल-थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर या कराराचं स्वरूप निश्चित करण्यात आलं. या कराराची अंमलबजावणी रविवारपासून होणार असून ही युद्धबंदी ४२ दिवसांची असेल. अल थानी यांनी काल दोहामध्ये या कराराबाबत माहिती दिली. या करारामुळे इस्रायलच्या ओलिसांची मुक्तता केली जाईल आणि गाझामध्ये मानवतावादी मदतीला चालना मिळेल. इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होऊ...