August 24, 2024 3:50 PM August 24, 2024 3:50 PM
10
युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव
शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करुन प्रधानमंत्री आज मायदेशी परतले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहीलं असून युक्रेनमधल्या पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत. रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भा...