September 6, 2025 2:56 PM September 6, 2025 2:56 PM

views 14

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्यपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्काराज याच्यासोबत होईल. कार्लोस यानं नोव्हाक जोकोविचवर ६-४, ७-६, ६-२ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत गॅब्रिएला दाब्रोवस्की आणि एरिन राऊटलिफ यांनी अग्रमानांकित कॅटरीना सिनियाकोव्हा आणि टेलर टाऊनसेंड या जोडीवर ६-४, ६-४ अशी सहज मात करून अजिंक्यपद पटकावलं. तर मिश्र दुहेरीत सारा एरानी आणि अँड्रिया वाव...

August 27, 2024 8:32 PM August 27, 2024 8:32 PM

views 2

टेनिस स्पर्धेत पोलंडची इगा श्वियांतेक, स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा यानिक सिनर मैदानात

यूएस खुल्या टेनिस स्पर्धेत आज पोलंडची इगा श्वियांतेक, स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा यानिक सिनर मैदानात उतरतील. अग्रमानांकित यानिक सिनर कथित अंमली पदार्थ सेवन प्रकरणानंतर पहिल्यांदाच खेळणार आहे. या वर्षीच्या तीनपैकी दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या कार्लोस अल्काराजकडेही टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे. इगा श्वियांतेक आणि कार्लोस अल्काराज या दोघांनीही २०२२मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं आणि आता या वर्षीच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.