July 16, 2024 9:25 AM July 16, 2024 9:25 AM

views 14

छत्रपती संभाजीनगर येथे म्हाडाची आज संगणकीय सोडत

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे,सदनिका, निवासी भूखंडाचा यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.  

July 9, 2024 7:15 PM July 9, 2024 7:15 PM

views 8

म्हाडा मुंबई मंडळाच्या १७६ अनिवासी गाळे ई-लिलावातल्या यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणार

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध वसाहतींमधल्या १७६ व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी राबवलेल्या ई-लिलावातल्या यशस्वी अर्जदारांना उद्यापासून, म्हणजे १० जुलैपासून तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणार आहे. तसंच बोलीच्या १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्रही घेता येणार आहे. बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटपपत्र आणि अनिवासी गाळ्याचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. या यशस्वी अर्जदारांच्या स्...