September 19, 2024 6:44 PM September 19, 2024 6:44 PM

views 9

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जिगांव प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलडाणा इथं दिलं.    मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सन्मान मेळाव्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्र...

August 11, 2024 7:25 PM August 11, 2024 7:25 PM

views 20

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या  योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारन...

August 11, 2024 7:22 PM August 11, 2024 7:22 PM

views 14

अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेण्याची गरज-डॉ. नीलम गोऱ्हे

ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारची राजकीय अशांतताच असून, अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या. पक्ष संघटना सोडून गेलेल्यामंध्ये, एकमेकांमध्येच हा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी भाषिक जहरीपणा आणला जातो, तो चुकीचा आहे, असं त्या म्हणाल्या.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचा...