June 18, 2025 3:25 PM June 18, 2025 3:25 PM
15
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरु झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं, त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. देहू इथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सुमारे ५०० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान ठेवेल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्त...