June 21, 2024 7:24 PM June 21, 2024 7:24 PM

views 12

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार प्रदान

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकार संघाच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल, पत्रकार पंकज दळवी आणि प्रमोद तेंडुलकर हे इतर पुरस्कारांचे मानकरी ठरले.  या समारंभात वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व द...