January 22, 2025 9:38 AM January 22, 2025 9:38 AM

views 6

न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.