August 24, 2024 10:15 AM August 24, 2024 10:15 AM
14
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई
महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृहविभागाला नोटीस बजावली असून त्यात न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.