November 11, 2024 2:13 PM November 11, 2024 2:13 PM
17
महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जाती-धर्माच्या प्रचाराला न भुलता विकासाचं राजकारण करणाऱ्यांना मत द्या असं आवाहन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते काल नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. वैद्यकीय महाविद्यालय, सर्कुलर बस, झोपडपट्टी पुनर्वसन करून महायुती सरकारनं विकास केल्याचं फडणवीस म्हणाले.