February 6, 2025 9:06 AM February 6, 2025 9:06 AM

views 6

प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीशी संबंधित एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असून देशभरातील 120 सांस्कृतिक नृत्य पथकं आपली कला सादर करणार आहेत. दरम्यान, प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमस्था...

February 5, 2025 4:18 PM February 5, 2025 4:18 PM

views 2

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही भक्तिमय झालं होतं, अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या. जीवनदायिनी गंगा देशवासियांना शांती, सद्बुद्धी,...

February 4, 2025 11:07 AM February 4, 2025 11:07 AM

views 6

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज महाकुंभला भेट देणार

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज प्रयागराज इथं महाकुंभला भेट देणार असून ते त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळयात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दोन कोटी 33 लाख भाविकांनी अमृत स्नान केलं. राज्य सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. अमृत स्नानाची सुरूवात 13 आखाड्यांच्या संत, साधूंनी केली आणि त्यानंतर भाविकांनी स्नान केलं. यावेळी संतांवर पुष्पवृष्टी कऱण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव संगमस्थानावर पोहोचण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ...

February 3, 2025 11:09 AM February 3, 2025 11:09 AM

views 6

महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम...