October 14, 2024 6:20 PM October 14, 2024 6:20 PM

views 8

तलाठी आणि कोतवाल पदाच्या नावात राज्य सरकारकडून बदल

राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली आहेत.