August 18, 2024 3:49 PM August 18, 2024 3:49 PM

views 16

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा ‘मविप जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा ‘मविप जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्काराकरता प्रा. रोहिणी गोडबोले आणि डॉ. अजय सूद, यांची तर डॉ. कमला सोहोनी पुरस्काराकरता डॉ. माधव गाडगीळ, आणि डॉ. महताब बामजी, यांची निवड झाली आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या ५९व्या वार्षिक अधिवेशनात १६नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील.