October 12, 2024 7:05 PM October 12, 2024 7:05 PM
10
मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करण्याचं राज ठाकरे यांचं मतदारांना आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त मतदारांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांनी बेसावध राहू नये, मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र साकारण्याची संधी जनतेनं द्यावी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. आजपर्यंत जनतेनं ज्यांना निवडून दिलं, त्यांनी जनतेच्या मतांशी प्रतारणा केली, त्यांना गृहीत धरलं, असा आरोपही त्यांनी के...