December 5, 2024 2:58 PM December 5, 2024 2:58 PM
12
पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने पटकावलं विजेतेपद
ओमान येथे झालेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा ५ - ३ असा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया कप स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं. हा विजय भारतीय हॉकी संघासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. खेळाडूंचं अतुलनीय कौशल्य, धैर्य आणि स...