June 18, 2024 7:30 PM June 18, 2024 7:30 PM

views 5

लातूर जिल्ह्यात 200 हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते भरड धान्य पेरणी करून जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर भरड धान्य पेरणी करण्याचा प्रारंभ झाला. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारानं जिल्ह्यात भरड धान्य उत्पादन वाढवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात आहे.  भरड धान्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं अध्यक्ष पाशा पटेल यांनी याप्रसंगी सांगितलं.

June 18, 2024 2:51 PM June 18, 2024 2:51 PM

views 17

योग आणि भरड धान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

योग आणि भरड धान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे.पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन त्यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या १० व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे.यामुळे सुदृढ राष्ट्रनिर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळेल,असं प्रधानमंत्री म्हणाले.