June 22, 2024 2:19 PM June 22, 2024 2:19 PM

views 17

इस्राएलच्या फौजांनी केलेल्या बॉम्बवर्षावात किमान २५ जण मृत्यूमुखी तर ५० जण जखमी

राफाहच्या उत्तरेकडे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभारलेल्या छावण्यांवर काल इस्राएलच्या फौजांनी केलेल्या बॉम्बवर्षावात किमान २५ जण मृत्यूमुखी पडले तर इतर ५० जण जखमी झाले. त्याआधी इस्राएली फौजांनी मुवासी या ग्रामीण भागाच्या मध्यवर्ती ठिकणी उभारलेल्या मानवतावादी मदत छावणीच्या परिसरात बॉम्बवर्षाव केला होता. याठिकाणी, विस्थापितांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आश्रय घेतला आहे.