February 5, 2025 4:16 PM February 5, 2025 4:16 PM

views 7

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे. 

October 15, 2024 9:49 AM October 15, 2024 9:49 AM

views 6

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी, संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत झाली बैठक

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी या विषयावरील संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. तथापि या समितीचं नियमानुसार काम होत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, AIMIM चे असदुद्दीन ओवेसी, डीएमकेचे ए. राजा यांचा यामध्ये समावेश आहे  

July 3, 2024 3:42 PM July 3, 2024 3:42 PM

views 12

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरच्या पाणी पुरवठा योजनांची कामं मार्गी लावण्यासाठी अटी आणि शर्थींच्या अधीन रा...