February 4, 2025 1:51 PM February 4, 2025 1:51 PM

views 13

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरील चर्चेला आज प्रधानमंत्री लोकसभेत उत्तर देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरल्या चर्चेला काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरूवात झाली.  

January 22, 2025 10:55 AM January 22, 2025 10:55 AM

views 10

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री आज भाजपच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी नमो अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधणार आहेत. “मेरा बूथ सबसे मजबूत” हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीतील 256 प्रभागांतील, 13 हजार 33 पक्षाचे खासदार, आमदार, मतदान केंद्रांवरील पक्ष कार्यकर्ते दृक-श्राव्य माध्यमातून प्रधानमंत्र्यांचा संदेश ऐकतील. त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं नमो अॅपचे राष्ट्रीय समन्वयक कुलजीत ...

January 15, 2025 3:58 PM January 15, 2025 3:58 PM

views 9

येत्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

येत्या रविवारी १९ तारखेला आकाशवाणीवर 'मन की बात' कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११८वा भाग असेल. त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकाबरोबर मायजीओव्ही आणि नमो ॲपवरुनही संपर्क साधता येईल.

December 12, 2024 1:48 PM December 12, 2024 1:48 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल झाल्याचं निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झाले, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विशिष्ट उद्योगपतींसाठी एटीएम म्हणून वापर केला जात असे, अशीही टीका सीतारामन यांनी समाजमाध्यमां...

December 7, 2024 2:15 PM December 7, 2024 2:15 PM

views 9

देशभरात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशभरात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यानं दिल्ली ते हरयाणा दरम्यानचा प्रवास सोपा होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चार वर्षांत पूर्ण होणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यांतर्गत या कॉरिडॉरला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती.  

December 5, 2024 1:41 PM December 5, 2024 1:41 PM

views 19

फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांचं सरकार अवघ्या तीन महिन्यात कोसळलं

फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांचं सरकार अवघ्या तीन महिन्यात कोसळलं आहे. सत्ता स्वीकारल्यानंतर अवघ्या ३ महिन्याच्या काळातच बार्नियर यांचं सरकार कोसळलं. सोमवारी त्यांनी संसदेत मतदानाशिवाय वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेतल्या ५७७ पैकी ३३१ खासदारांनी बार्नियर सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं. बार्नियर यांनी सादर केलेला तंत्रज्ञान आधारित अर्थसंकल्प फ्रान्सची वाढती सुरक्षा आव्हानं आणि गुन्हेगारीचा सामना करण्यासा...

November 11, 2024 2:26 PM November 11, 2024 2:26 PM

views 2

श्री स्वामीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी केलं संबोधित

भारतीय तरुणांच्या क्षमतेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून जागतिक नेत्यांना भारतीय तरुणांनी त्यांच्या देशात काम करण्याची अपेक्षा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे वडताल इथं श्री स्वामीनारायण मंदिराच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी आज सकाळी दूरदृश्य माध्यमाद्वारे संबोधित केलं. कुशल मनुष्यबळ असलेल्या भारतीय तरुणांची जागतिक मागणी आणखी वाढणार असून विकसित भारतासाठी तरुणांना सशक्त केलं पाहिजे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी सरकारनं २०० रुपयां...

November 6, 2024 10:50 AM November 6, 2024 10:50 AM

views 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलं दुःख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बिहार कोकिळा नावानं ओळखल्या जाणाऱ्या सिन्हा यांनी आपल्या लोकगीतांनी देशात आणि परदेशातही आध्यात्मिक वातावरण तयार केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी भाषांमधली लोकगीतं अनेक दशकं लोकप्रिय होती आणि त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे.  

October 5, 2024 11:33 AM October 5, 2024 11:33 AM

views 10

प्रधानमंत्री आज वाशिम तसंच ठाणे दौऱ्यावर-विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या च्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता यावेळी जारी करण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे एक हजार ९२० कोटी रुपयांचे प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील. पोहरादेवी इथं "बंजारा विरासत संग्रहालयाचं" उद्‌घाटन पंतप्रधा...

October 3, 2024 8:28 PM October 3, 2024 8:28 PM

views 15

प्रधानमंत्र्यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ-लिलावाची तारीख ३१ ऑक्टोबर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ- लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. या लिलावातून मिळणारा निधी नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येनं बोली लावून या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे.