July 3, 2024 8:25 PM July 3, 2024 8:25 PM
8
देशाची राज्यघटना प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच राजकीय वारसा नसलेल्या व...