September 20, 2024 10:36 AM September 20, 2024 10:36 AM
7
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरल पार्कची पायाभरणी करतील. या एक हजार एकरवर पसरलेल्या पार्कची निर्मिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडू...