October 5, 2024 7:29 PM October 5, 2024 7:29 PM
12
मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ठाण्यात पायाभूत सुविधांच्या ३२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यावर ते बोलत होते. यात बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो ३ चं उद्घाटन, ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईत घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारीत भागाची पायाभरणी यांचा समावेश आहे. याशिवाय ‘नैना’ अर्थात नवी मुंबई वि...