August 27, 2024 8:34 PM August 27, 2024 8:34 PM
15
रत्नागिरीत परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपासाकरता SIT ची स्थापना
रत्नागिरी इथं एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक/वैज्ञानिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.