September 27, 2024 12:55 PM September 27, 2024 12:55 PM
8
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड आणि बिहारमध्ये आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून उत्तराखंड, पूर्वांचल तसंच हिमाचल प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.