August 16, 2025 3:17 PM August 16, 2025 3:17 PM
15
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट
मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मध्यरात्री सुमारे २ वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या ५ वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट २०२० रोजी २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी, सांताक्रूझ, सायन आणि जुहू या परिसरांमध्य...